Posts

भाग 3

🔰 *रिच डॅड पुअर डॅड -* ✍ *रॉबर्ट टी. कियोसाकी* 📝 *अनुवाद : अभिजित थिटे* ➡️ *भाग :- 03* *🔰 प्रकरण २* *❤️ धडा पहिला :* *_श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत._*      ‘डॅड, श्रीमंत कसं व्हायचं ते मला सांगाल?’ माझे डॅड संध्याकाळी आलेलं वर्तमानपत्र वाचत होते. माझा प्रश्न ऐकताच त्यांनी ते खाली ठेवलं आणि विचारलं, ‘पण तुला श्रीमंत का व्हायचं आहे?’ ‘कारण आज जिमीची आई त्यांच्या नव्या कॅडिलॅक गाडीतून त्यांच्या बीच हाउसवर वीकेंडसाठी गेल्या आहेत. जिमीनं त्यांच्यासोबत त्याच्या तीन मित्रांनाही नेलं. फक्त मला आणि माईकला नेलं नाही. आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला बोलावलं नाही, असं तो म्हणाला.’ ‘म्हणून तुम्हाला नेलं नाही?’ डॅडनं अविश्वासानं विचारलं. ‘हो,’ मी म्हणालो. डॅडनं शांतपणे आपलं डोकं हलवलं. खाली घसरलेला चष्मा परत वर घेतला आणि ते वर्तमानपत्र वाचू लागले. मी त्यांच्या उत्तराची वाट पाहात तसाच उभा होतो. ते वर्ष होतं १९५६. मी नऊ वर्षांचा होतो. काही दैवगतीमुळे मी नेमका श्रीमंत मुलांच्या शाळेत जात होतो. आमच्या गावात प्रामुख्यानं उसाची लागवड केली जायची. वसाहतीतील मॅनेजर्स, डॉक्टर्स, ब

प्रकरण 1 भाग 2

🔰 *रिच डॅड पुअर डॅड -* ✍ *रॉबर्ट टी. कियोसाकी* 📝 *अनुवाद : अभिजित थिटे* 📚  *प्रकरण १* *_रिच डॅड पुअर डॅड -  भाग :- 02_* ➡️ रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितल्यानुरुप 📖 ... मला दोन वडील होते. एक श्रीमंत, तर एक गरीब. त्यापैकी एक खूप उच्चशिक्षित आणि बुध्दिमान होते. त्यांनी पीएच.डी. मिळवली होती. महाविद्यालयातील चार वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी दोनच वर्षांच्या आतच पूर्ण केला होता. पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती. तिच्या साहाय्यानं त्यांनी स्टॅनफोर्ड, शिकागो आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून उच्चशिक्षण पूर्ण केलं. दुसऱ्या वडिलांनी आठवी इयत्ताही पूर्ण केली नव्हती. दोघांनीही आयुष्यभर कष्ट केले. दोघंही आपापल्या क्षेत्रात यशस्वीही ठरले. फक्त त्यापैकी एक आर्थिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडत राहिले, तर एक हवाई राज्यातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले. एकानं आपल्या पाठी कुटुंब, चर्च आणि चॅरिटीसाठी लक्षावधी डॉलर्सची संपत्ती मागे ठेवली, तर दुसऱ्यानं फक्त बिलं! दोघांचीही व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावी आणि आकर्षक होती. दोघंही खंबीर स्वभावाचे होते. त्यांचा लो

प्रकरण 1 भाग :- 01

🔰 *रिच डॅड पुअर डॅड* *📖…… भाग :- 01* ✍ *रॉबर्ट टी. कियोसाकी* 📝 *अनुवाद : अभिजित थिटे* 💰 *आधी थोडंसं... गरज आहे!* ‘खऱ्या जगात स्वतंत्रपणे उभं राहाता यावं, याची तयारी शाळा करून घेतात का? त्या मुलांची चांगली तयारी करून घेतात का? खूप अभ्यास करा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगला पगार आणि फायदे देणारी नोकरी मिळेल,’ असं माझे आई–वडील नेहमी सांगत असत. मी आणि माझ्या मोठ्या बहिणीनं जीवनात यशस्वी व्हावं, यासाठी आम्हाला उत्तमातील उत्तम शिक्षण द्यायला हवं. हेच त्यांच्यापुढचं ध्येय होतं. १९७६मध्ये मी पदविका मिळवली. त्यानंतर फ्लोरिडा स्टेट विद्यापीठाची पदवी मिळवली. पदवी परीक्षेत अकाउंटिंग विषयात मला सर्वाधिक गुण मिळाले होते. त्यावेळी त्यांची ध्येयपूर्ती झाली. त्यांच्या जीवनातला तो यशाचा मुकुटमणी होता. आमच्या ‘मास्टर प्लॅन’प्रमाणे मला त्या काळातील सर्वाेत्तम मानल्या जाणाऱ्या अकाउंटिंग कंपन्यांपैकी एकीनं नोकरी देऊ केली. आता मला यशस्वी कारकीर्दीचे वेध लागले होते. भरपूर पैसे कमावून वेळेआधीच निवृत्ती घेण्याची मी स्वप्नं पाहू लागले होते. माझे पती मायकेल, हेदेखील याच मार्गानं गेले. आम