प्रकरण 1 भाग :- 01
🔰 *रिच डॅड पुअर डॅड*
*📖…… भाग :- 01*
✍ *रॉबर्ट टी. कियोसाकी*
📝 *अनुवाद : अभिजित थिटे*
💰 *आधी थोडंसं... गरज आहे!*
‘खऱ्या जगात स्वतंत्रपणे उभं राहाता यावं, याची तयारी शाळा करून घेतात का? त्या मुलांची चांगली तयारी करून घेतात का? खूप अभ्यास करा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगला पगार आणि फायदे देणारी नोकरी मिळेल,’ असं माझे आई–वडील नेहमी सांगत असत. मी आणि माझ्या मोठ्या बहिणीनं जीवनात यशस्वी व्हावं, यासाठी आम्हाला उत्तमातील उत्तम शिक्षण द्यायला हवं. हेच त्यांच्यापुढचं ध्येय होतं. १९७६मध्ये मी पदविका मिळवली. त्यानंतर फ्लोरिडा स्टेट विद्यापीठाची पदवी मिळवली. पदवी परीक्षेत अकाउंटिंग विषयात मला सर्वाधिक गुण मिळाले होते. त्यावेळी त्यांची ध्येयपूर्ती झाली. त्यांच्या जीवनातला तो यशाचा मुकुटमणी होता. आमच्या ‘मास्टर प्लॅन’प्रमाणे मला त्या काळातील सर्वाेत्तम मानल्या जाणाऱ्या अकाउंटिंग कंपन्यांपैकी एकीनं नोकरी देऊ केली. आता मला यशस्वी कारकीर्दीचे वेध लागले होते. भरपूर पैसे कमावून वेळेआधीच निवृत्ती घेण्याची मी स्वप्नं पाहू लागले होते.
माझे पती मायकेल, हेदेखील याच मार्गानं गेले. आम्हा दोघांची कुटुंबं अतिशय कष्टाळू आणि कामसू होती. उत्पन्न मर्यादित असलं, तरी काम हाच आमचा मंत्र होता. मायकेल द्विपदवीधर झाले. त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली, त्यानंतर कायद्याची. पेटंटच्या कायद्यात विशेषज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या वॉशिंग्टनमधील एका विख्यात कंपनीनं त्यांना बोलावून घेतलं. आता त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होतं. उत्तम कारकीर्द आणि वेळेआधी निवृत्ती!
आम्हा दोघांचीही कारकीर्द उत्तम सुरू होती. आम्ही त्या दृष्टीनं यशस्वी असलो, तरी अपेक्षेनुसार काही घडताना दिसत नव्हतं. निवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज करण्यासाठी आम्ही अनेकदा नोकऱ्या बदलल्या. वरचे हुद्दे मिळवत गेलो, तरीही आमच्या संचयात जी काही भर पडत होती, ती आमच्याच पैशांची होती.
आमचं वैवाहिक जीवन अगदी सुखी आणि समाधानी आहे. आमची तिन्ही मुलं अगदी सद्गुणी. दोघंजण माध्यमिक विद्यालयात आहेत, तर एक शाळेत जायला लागलाय. आपल्या मुलांना उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळावं यासाठी आमची धडपड सुरू असते. त्यासाठी आम्ही खूप खर्चही करतो. १९९६ साल होतं ते. एकेदिवशी माझा मुलगा शाळेतून अगदी निराश होऊन घरी परतला. त्याला सारं काही नीरस वाटत होतं. अभ्यासाचा तर प्रचंड कंटाळा आला होता. ‘जे माझ्या आयुष्यात कधीही उपयोगी पडणार नाही, त्याच्या अभ्यासात मी वेळ का घालवला?’ असा त्याचा साधा प्रश्न होता.
मी चटकन उत्तर दिलं, ‘तू जर शाळेत चांगला अभ्यास केला नाहीस, चांगले गुण मिळवले नाहीस, तर तुला महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही.’
‘मी महाविद्यालयात जाईन किंवा जाणारही नाही; श्रीमंत मात्र नक्कीच होईन,’ त्यानं उत्तर दिलं.
‘तू जर पदवीधर झाला नाहीस, तर तुला चांगली नोकरीही मिळणार नाही आणि तुला नोकरी मिळाली नाही, तर तू श्रीमंत कसा होशील?’ माझ्या प्रश्नात ‘आई’च्या काळजीची छटा होती.
माझा प्रश्न ऐकून तो थोडासा हसला. त्यानं कंटाळ्यानं मान हलवली. जरा वेळ खाली पाहात राहिला. आमचं हेच संभाषण याआधी अनेकदा झालं आहे. पुन्हा एकदा माझा ‘आईचा सल्ला’ ऐकताना त्याने कान बंद करून घेतले होते. त्याची इच्छाशक्ती तेवढीच जबरदस्त आहे आणि हे सारं असूनही तो विनयशील आणि इतरांचा मान राखणारा आहे.
माझं बोलणं झाल्यावर त्यानं मान वर केली आणि म्हणाला, ‘आई,’ ही मला मिळणाऱ्या व्याख्यानाची नांदी होती. ‘आई, काळाबरोबर चालायला शीक. जरा आजूबाजूला पाहा. ही श्रीमंत मंडळी त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे श्रीमंत नसतात. मायकल जॉर्डन आणि मॅडोनाकडे पाहा. हॉवर्ड विद्यापीठातलं शिक्षण अर्धवटच ठेवलेल्या बिल गेट्सचं उदाहरण घे. त्यांनीच मायक्रोसॉफ्टची स्थापना केली आणि तिशीत असतानाच ते अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
त्या बेसबॉलच्या खेळाडूवर तर मानसिकरीत्या अपरिपक्व असल्याचा शिक्का आहे. तरीही तो वर्षाला चाळीस लाख डॉलर्स कमावतो.’
त्याचं बोलणं संपलं आणि शांतता पसरली. मला माझे आई–वडील जो सल्ला देत होते, तेच मी माझ्या मुलाला सांगत होते. आजूबाजूचं जग कितीही बदललं, तरी सल्ला कायमच राहिला होता.
उत्तम शिक्षण घेतलं आणि गुण मिळवल्यानंतर तुम्ही यशस्वी होताच असं नाही, हे माझ्यापेक्षा माझ्या मुलाच्याच जास्त लवकर लक्षात आलं होतं.
‘आई,’ तो पुढे बोलू लागला, ‘मी काही तू आणि डॅडींएवढे कष्ट करणार नाही. तू खूप पैसे मिळवतेस. आपण खूप मोठ्या घरात राहातो. माझ्याकडे खूप खेळणी आहेत, हेही खरं आहे; पण मी जर तुझा सल्ला ऐकला, तर माझ्यावरही तुझ्यासारखीच वेळ येईल. कर भरण्यासाठी खूप कष्ट करायचे आणि शेवटी कर्ज फेडतच बसायचं. आता तर नोकरीचीही शाश्वती नसते. कंपन्यांमध्ये नोक रकपात असते, त्याला ‘डाउनसायझिंग’ किं वा ‘राइटसायझिंग’ अशी नावं असतात हेही मला माहीत आहे. तू पदवीधर झालीस आणि नोकरी करू लागलीस, तेव्हा तुला मिळणाऱ्या पगाराएवढा पगारही आज नव्या लोकांना मिळत नाही. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांकडे त्यांनाही आता पूर्वीसारखं उत्पन्न मिळत नाही. मला हेही माहीत आहे, की मी निवृत्तीनंतर ‘सामाजिक सुरक्षितता योजना’ किंवा निवृत्तीवेतनावर अवलंबून राहू शकणार नाही. मला काही नव्या प्रश्नांची नव्यानं उत्तरं हवी आहेत.’
त्याचं बरोबर होतं. आता मलाही काही नव्या प्रश्नांची नवी उत्तरं शोधायची होती. माझ्या आई–वडिलांनी दिलेला सल्ला १९४५ पूर्वी जन्मलेल्यांसाठी उपयुक्त असलेही कदाचित; पण वेगानं बदलणाऱ्या या जगात जन्मलेल्यांसाठी तो अनर्थकारक ठरू शकतो. आता मी माझ्या मुलांना, ‘शाळेत जा, भरपूर शिका आणि सुरक्षित नोकरी मिळवा,’ असं सांगू शकत नाही.
आता मुलांच्या शिक्षणाचाही नव्यानं विचार करायला हवा, हेही मला जाणवलं.
शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्थिक विषय कधीच नसतात, याची मला एक आई आणि अकाउंटंट म्हणून काळजी वाटू लागली. आज शालेय शिक्षण पूर्ण करण्याआधीच मुलांकडे क्रेडिट कार्ड आलेली असतात; पण त्यांना आर्थिक विषयांची काहीच जाण नसते. पैसे कसे गुंतवावेत किंवा ते वापरत असलेल्या क्रेडिट कार्डवरची व्याज आकारणी कशी होते, हेही त्यांना माहीत नसतं. सोप्या शब्दांत, आर्थिक साक्षरता आणि पैशांबाबतचं ज्ञान असल्याशिवाय ते या बदलत्या जगाला तोंड देऊच शकणार नाहीत. आजच्या जगात तर बचतीपेक्षा खर्चाला जास्त महत्त्व दिलं जातं. अशावेळी हे ज्ञान आवश्यकच ठरतं.
माझा थोरला मुलगा महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकला होता. त्या कर्जात आकंठ बुडाला होता. मी त्याला त्यातून बाहेर पडून ती सारी क्रेडिट कार्ड नष्ट करण्यासाठी मदत केली आणि माझ्या मुलांना अर्थ विषयक प्रशिक्षण देऊ शकेल, अशा अभ्यासक्रमाचा शोध सुरू केला.
एके दिवशी माझ्या पतीनं मला कार्यालयातून फोन केला. ते म्हणाले, ‘माझ्यासमोर रॉबर्ट कियोसाकी नावाचे एक गृहस्थ बसलेले आहेत. ते व्यावसायिक आणि गुंतवणूकदार आहेत. माझ्याकडे ते एका अभ्यासक्रमाचं पेटंट घेण्यासाठी आले आहेत. मला वाटतं तू ज्याच्या शोधात होतीस, ते सापडलं आहे. तू त्यांना भेट.’
मी ज्याच्या शोधात होते तेच ते :
रॉबर्ट कियोसाकी हे ‘कॅश फ्लो’ नावाचा एक अर्थविषयक शिक्षण देणारा अभ्यासक्रम विकसित करत होते. मायकेलना ती संकल्पना प्रचंड आवडली. आम्ही दोघांनीही त्याबाबत चौकशी केली आणि आमची उत्सुकता पाहून त्यांनी आम्हाला त्याच्याच प्रायोगिक कार्यशाळेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. तो शैक्षणिक खेळ असल्यामुळे मी आमच्यासोबत महाविद्यालयात जाऊ लागलेल्या आमच्या १९ वर्षांच्या कन्येलाही घेऊन गेले.
या प्रशिक्षणात १५ जण सहभागी झाले होते. आमचे तीन गट करण्यात आले.
माईकचं म्हणणं अगदी योग्य होतं. मी ज्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या शोधात होते, ते मला सापडलं होतं. आमच्यासमोर एक ‘व्यापारा’सारखा बोर्ड होता. त्याच्या मध्यभागी एक रंगीत झोकदार वेशभूषेतील मोठ्ठा उंदीर होता. बाहेरच्या बाजूचा आणि आतल्या बाजूचा असे दोन मार्गही होते. आतल्या बाजूचा मार्ग होता ‘रॅट रेस’ आणि बाहेरच्या बाजूच्या मार्गाला ‘फास्ट ट्रॅक’ असं नाव होतं. खेळणाऱ्यांनी आतल्या मार्गातून बाहेरच्या मार्गावर यायचं होतं. रॉबर्ट यांच्या म्हणण्यानुसार तो श्रीमंत लोकांचा मार्ग होता.
एकदा बोर्ड समजावून सांगितल्यानंतर रॉबर्ट ‘रॅट रेस’बद्दल सांगू लागले.
‘तुम्ही कोणत्याही सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या, अगदी कष्टाळू माणसाचं उदाहरण घ्या. सगळ्यांचा मार्ग अगदी आखलेला असतो. मुलाचा जन्म होतो. तो काही वर्षांनी शाळेत जाऊ लागतो. पुढे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयात जातो. चांगल्या गुणांनी पदवी मिळवतो. पदवी मिळाली, की त्याचे आई–वडील कृतकृत्य होतात. आता सारंकाही ठरवल्याप्रमाणे घडत जातं. तो पदवीधर मुलगा मग चांगल्या आणि सुरक्षित नोकरीचा शोध घेऊ लागतो. तो सैन्यात जातो, सरकारी नोकरीत जातो, डॉक्टर होतो किंवा वकील होतो. नोकरी मिळाली, की त्याच्या हाती पैसा खेळू लागतो. त्याबरोबर बरीच क्रेडिट कार्डंही हाती पडतात आणि मग सुरू होतो खरेदीचा सिलसिला. जर तो अजूनपर्यंत सुरू झालेला नसला तर!
खर्च करण्यासाठी हाती पैसा असल्यामुळे ही मुलंही इतर तरुण मुलं नेहमी जिथं दिसतात, तिथंच जाऊ लागतात. अनेकजण भेटतात. मैत्री निर्माण होते. एखादी मुलगी भेटते. प्रेम जुळतं. काहीवेळा लग्नही होतं. आता तर आयुष्य खूप आनंदी आणि समाधानी झालेलं असतं. दोन प्रेमी जीव एक झालेले असतात. त्यात दोघंही नोकरी करणारे असतात, त्यामुळे भरपूर पैसा असतो. दोघांच्या पगारामुळे पैसे साठू लागतात. मग ते घर, गाडी, टीव्ही वगैरे गोष्टी खरेदी करण्याचं ठरवतात आणि तशी करतातही. एखाद्या मोठ्या सहलीलाही जाऊन येतात. आता त्यांना एखादं अपत्य हवं असतं. मग तेही होतं. मुलाची जबाबदारी आल्यानंतर पुन्हा पैशांची गरज भासू लागते. या आनंदी आणि सुखी जोडप्याला आपलं करिअरही तितकंच महत्त्वाचं वाटत असतं. बढती मिळावी, पगारवाढ व्हावी यासाठी आता ते दुप्पट काम करू लागतात. त्याचवेळी दुसरं अपत्यही जन्माला येतं. आता ते घर पुरेनासं होतं. त्यांना मोठं घर हवं असतं. अधिक पैसे मिळवण्यासाठी ते कामाला वाहूनच घेतात आणि सर्वाेत्कृष्ट कर्मचारी होतात. वाढत्या गरजेमुळे अधिक पैसेही हवे असतात. मग ते अधिक चांगली नोकरी किंवा बढतीसाठी वेगवेगळे अभ्यासक्रमही करतात. त्याचं फळ मिळतं. पगार वाढतो. उत्पन्न वाढलं, की प्राप्तीकर, मिळकत कर, सामाजिक सुरक्षा कर आणि इतर करांमध्येही वाढ होते. त्यांना मोठा पगार मिळतो खरा; पण तो कुठं जातो हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. ते क्रेडिट कार्ड वापरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात आणि वाणसामानही आणतात. आता मुलं पाच–सात वर्षांची झालेली असतात. त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची काळजी यांना सतावू लागते. मुलांचं शिक्षण आणि आपली निवृत्ती यासाठी बचत करण्याची गरज वाटू लागते.
सुमारे पस्तीशीचं हे दांपत्य आता ‘रॅट रेस’मध्ये अडकतं. आता ते कंपनीच्या मालकांसाठी, वेगवेगळे कर भरण्यासाठी, सरकारसाठी, घराचे आणि क्रेडिट कार्डचे हप्ते फेडण्यासाठी आणि बँकेसाठी काम करतात.
तेही आपल्या मुलांना तोच, खूप अभ्यास करून उत्तम गुणांनी पदवी मिळवण्याचा आणि सुरक्षित नोकरी शोधण्याचा सल्ला देतात. ते आपल्या आयुष्यात पैशांविषयी काहीच ज्ञान मिळवत नाहीत. आयुष्यभर फक्त कष्ट करत राहातात. त्यांची मुलंही त्याच मार्गानं जातात. यालाच ‘रॅट रेस’ म्हणतात.’
‘रॅट रेस’मधून बाहेर पडण्यासाठी अकाउंटिंग आणि गुंतवणूक हे विषय पक्के करायला हवेत, असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात, या दोन्ही विषयांवर प्रभुत्व मिळवणं अवघड आहे. रॉबर्ट यांनी हा विषय मौजेचा आणि गमतीदार बनवला होता, याचं सर्वाेत्तम असलेल्या अकाउंटिंग कंपनीत काम केलेल्या आणि सीपीएचं शिक्षण घेतलेल्या मलाही कौतुक वाटलं. त्यांनी या साऱ्या गोष्टी त्या खेळामध्ये इतक्या बेमालूमपणे दडवल्या होत्या, की खेळ सुरू केल्यानंतर काही वेळातच आम्हाला आपण काहीतरी शिकत आहोत, हे विसरून गेलो. आता आम्ही सारे अगदी मन लावून त्या ‘रॅट रेस’मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो.
तो खेळ खरंच मस्त होता. आम्ही खरोखर धमाल केली. एवढंच नाही, तर मी आणि माझी मुलगी आजपर्यंत ज्या विषयावर साधं बोललोही नव्हतो, त्याविषयी चर्चा करू लागलो. अकाउंटंटच असल्यामुळे मला खेळाचा भाग असलेले ‘इन्कम स्टेटमेंट’ आणि आर्थिक ताळेबंद हे दोन्ही भाग सहज पूर्ण करता आले. त्यामुळे मला माझ्या लेकीला आणि खेळातल्या सहकाऱ्यांना ते समजावून सांगता आले. त्यांना या गोष्टी समजत नव्हत्या. त्या दिवशी ‘रॅट रेस’मधून मी एकटीच बाहेर पडले. जवळजवळ तीन तास तो खेळ सुरू होता आणि मला बाहेर पडण्यासाठी फक्त पन्नास मिनिटं लागली.
माझ्या गटात एक उद्योगपती, एक बँकर आणि एक कॉम्प्युटर प्रोग्रामर असे तिघे होते. या तिघांचं अकाउंटिंग आणि गुंतवणूक या विषयांचं ज्ञान अगदीच तोकडं होतं आणि त्याचा मला खरंच त्रास झाला. ते आपापल्या आयुष्यात आर्थिक बाबी कशा हाताळत असतील, याचं मलाच आश्चर्य वाटत राहिलं. माझ्या १९ वर्षांच्या मुलीलाही या गोष्टी समजत नव्हत्या. तिचं वय पाहाता ही गोष्ट मान्यही होणारी होती; पण हे तिघं तिच्या दुप्पट वयाचे होते!
‘रॅट रेस’मधून बाहेर पडल्यानंतर उरलेले दोन तास मी माझी लेक आणि या तिघांचा खेळ पाहात होते. ते फासे टाकत होते आणि गुणांचा फलक सरकवत होते. या मोठ्या माणसांना अकाउंटिंगचा गंधच नव्हता, याचं मला दु:ख होत असलं, तरी ते शिकण्याचा प्रयत्न करत होते, ही गोष्टही आनंददायी होती. त्यांना इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यांच्यातील नातेसंबंध समजत नव्हता. ते जेव्हा एखाद्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करत, तेव्हा त्या व्यवहाराचा त्यांच्या मासिक कॅश फ्लोवर होणारा परिणामही त्यांच्या लक्षात येत नव्हता. केवळ शाळेत हे विषय न शिकवल्यामुळेच लाखो लोकांना हे असं झगडावं लागत असावं, असं मला वाटू लागलं.
ते खेळाचा आनंद घेत आहेत आणि त्यांना जिंकायचं आहे यातच सारंकाही आलं, अशी मी माझी तेवढ्यापुरती समजूत काढली. खेळ संपल्यानंतर रॉबर्टनं आम्हाला त्याविषयी चर्चा करण्यासाठी पंधरा मिनिटं दिली.
माझ्या गटातल्या उद्योगपतीला हा खेळ काही आवडला नव्हता. ‘या गोष्टी मला माहीत असणं आवश्यक आहे, असं मला वाटत नाही. त्यासाठी मी अकाउंटंट, बँकर आणि वकिलाची नेमणूक करेन,’ असं त्याचं म्हणणं होतं.
त्याला रॉबर्टनं उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘त्यांना जर या साऱ्याची माहिती आहे असं तुम्हाला वाटतं, तर तुमच्या माहितीतले किती अकाउंटंट, बँकर, वकील, शेअर दलाल, रिअल इस्टेट एजंट श्रीमंत आहेत? त्यांना याबाबत माहिती आहे, ते हुशारही आहेत; पण श्रीमंत नाहीत, हा मूलभूत फरक आहे. श्रीमंत लोकांना ज्या विषयाचं ज्ञान आहे, तो आपल्याला कधीच शिकवला जात नाही. त्यामुळेच तर आपण या मंडळींचा सल्ला घेत असतो. एखाद्या दिवशी तुम्ही गाडीनं कुठेतरी जात असता आणि वाहतुकीची कोंडी होते. तुम्ही अडकून पडता. त्याच कोंडीमध्ये अडकलेला तुमचा बँकर आणि वकीलही तुम्हाला दिसतो. यातच सारं आलं.’
कॉम्प्युटर प्रोग्रामरलाही हा खेळ पटलेला नव्हता. तो म्हणाला, ‘मी या साऱ्या गोष्टी शिकवणारं एखादं सॉफ्टवेअरच विकत घेईन.’
बँकर मात्र खूष होता. तो म्हणाला, ‘या खेळातला अकाउंटिंगचा भाग मी महाविद्यालयात शिकलो होतो. फक्त त्याचा व्यवहारात कसा उपयोग करायचा हे माहीत नव्हतं. आता मला ते समजलं आहे. या ‘रॅट रेस’मधून मला बाहेर पडायचंच आहे.’
माझ्या मुलीची प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती आणि मला ती सर्वात जास्त भावली. ती म्हणाली, ‘मला हे सारं शिकताना खूप मजा आली. पैसा कसं काम करतो आणि त्याची गुंतवणूक याविषयी खूप शिकता आलं. आता मी माझा व्यवसाय निवडू शकते. आता मी जे काही निवडणार आहे ते माझ्या आवडीनं निवडेन. नोकरीची शाश्वती, त्याचे फायदे किंवा पगार यासाठी मी निवड करणार नाही. हा खेळ ज्याचं शिक्षण देतो आहे, ते मी शिकले, तर मला ज्यात आनंद वाटतो, मनापासून जे आवडतं, ते करण्यासाठी स्वतंत्र असेन. काही उद्योगांना मनुष्यबळ हवं आहे, म्हणून मी नोकरी करणार नाही. मी जर हे सारं शिकले, तर माझ्या वर्गातील इतर मित्र–मैत्रिणींप्रमाणे नोकरीची सुरक्षितता आणि सामाजिक सुरक्षिततेची काळजी करण्याचं मला कारण नाही.’
खेळ आणि त्यानंतरची चर्चा संपल्यानंतर पुन्हा थांबून रॉबर्ट यांच्याशी बोलणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा भेटायचं ठरवलं. हा खेळ खेळणाऱ्यांची आर्थिक बुद्धीमत्ता वाढावी, हा त्यामागचा उद्देश असल्याचंही माझ्या लक्षात आलं. याचे पुढचे आराखडे समजून घेण्यासाठी मीही उत्सुक होते.
आम्ही भेटलो. आम्ही समविचारी असल्याचंही तेव्हा जाणवलं. आम्ही खेळ, नाटकं, हॉटेल्स, सामाजिक, आर्थिक अशा साऱ्या विषयांवर बोललो. बदलत्या जागतिक परिस्थिवरही चर्चा केली. बहुतेक अमेरिकनांनी निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी काहीच बचत केलेली नाही. ज्यांनी केली आहे, ती पुरेशी नाही. सामाजिक सुरक्षितता आणि वैद्यकीय योजना कशा दिवाळखोर झाल्या आहेत, यावरही आम्ही बराच वेळ बोललो. आपली मुलं साडेसात कोटी लोकांच्या निवृत्ती वेतनासाठी कर भरणार आहेत. निवृत्ती वेतन योजनांवर अवलंबून राहाणं किती जोखमीचं आहे, या गोष्टींची लोकांना जाणीवच नाही.
अमेरिका आणि जगभरच ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या गटांतील वाढत जाणारी दरी, याचीही रॉबर्ट यांना चिंता वाटत होती. स्व शिक्षण घेतलेला, स्वत:च्या पायांवर उभा राहिलेला, जगभर फिरलेला हा उद्योजक वयाच्या ४७व्या वर्षीच निवृत्त झाला होता. मला माझ्या मुलांच्या भवितव्याची काळजी वाटत होती, तसंच रॉबर्ट यांनाही वाटत होतं. जग ज्या झपाट्यानं बदलतं आहे, ते बदल शालेय शिक्षणात दिसत नाही, हेही त्यांना खटकत होतं. आपली ही प्राचीन शिक्षण पद्धती मुलांच्या आयुष्यातील बरीच वर्षं वाया घालवते आहे. ज्याचा उपयोग त्यांच्या भावी आयुष्यात होणार नाही, असे बरेच विषय ते शाळा आणि महाविद्यालयात शिकतात. जे जग अस्तित्त्वातच नाही, त्याला तोंड देण्याची तयारी ते या साऱ्या वर्षांमध्ये करत असतात, असं त्यांचं ठाम मत होतं.
‘शाळेत जा, खूप अभ्यास करा, महाविद्यालयात जा, पदवी मिळवा आणि सुरक्षित नोकरी शोधा, हा सर्वांत जुना आणि वाईट सल्ला आहे. तो आई–वडीलच देत असतात. तुम्ही आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील घटना बारकाईनं पाहिल्यात, तर तुम्हालाही माझ्याइतकीच काळजी वाटेल,’ ते सांगत होते. तुमच्या मुलांना भविष्यात आर्थिक सुरक्षितता हवी असेल, तर त्यांनी जुन्या नियमांप्रमाणे खेळणंच चुकीचं आहे, असं त्यांचं मत होतं.
‘जुने नियम?’ मी प्रश्न केला.
‘या खेळाचे माझ्यासारख्या लोकांचे नियम वेगळे आहेत. मी तुमचे नियम वापरत नाही. उदाहरण देतो. एखादी कंपनी नोकरकपातीची घोषणा करते, तेव्हा काय होतं?’
‘लोकांना कामावरून काढलं जातं. कुटुंबं दुखावली जातात. बेरोजगारी वाढते,’ मी उत्तर दिलं.
‘बरोबर; पण शेअर बाजारात काय चित्र दिसतं?’
‘अशी घोषणा झाली, की कंपनीच्या शेअर्सचा भाव वधारतो. कंपनीनं मनुष्यबळावरचा खर्च कमी केला, की शेअर बाजार त्याचं स्वागत करतो.’ माझं उत्तर होतं.
‘अगदी बरोबर,’ ते म्हणाले, ‘शेअर्सच्या किमती वाढल्या, की माझ्यासारखे भागधारक श्रीमंत होतात. यालाच मी वेगळे नियम म्हणतो. नोकरकपातीमुळे कर्मचाऱ्यांचं नुकसान होतं; पण त्याचवेळी मालकांचा आणि भागधारकांचा फायदा होतो.’
ते काही नोकर आणि मालकामधला फरक सांगत नव्हते, ते आपल्या आर्थिक परिस्थितीवरचा, आपल्या आयुष्यावरचा ताबा आपल्याच हाती ठेवण्याबाबत बोलत होते.
‘पण हे का घडतं, हे लोकांना समजत नाही. हे न्याय्य नाही, एवढंच त्यांना समजतं,’ मी म्हणाले.
‘म्हणूनच तर शाळेत जाऊन चाकोरीतलं शिक्षण घ्या, हा सल्ला मूर्खपणाचा आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीतून पदवीधर झालेली मुलं बाहेरच्या जगात आत्मविश्वासानं वावरतील, श्रीमंत होतील, असं समजणं मूर्खपणाचं आहे. प्रत्येक मुलाला या अशा शिक्षणाची गरज आहे. वेगळं शिक्षण आणि त्याचे वेगळे नियम मुलांना समजायला हवेत,’ ते कळकळीनं सांगत होते. ‘श्रीमंत लोकांचे पैशांचे नियम वेगळे आहेत आणि उरलेल्या ९५ टक्के लोकांचे वेगळे आहेत. यातले ९५ टक्के नियम घरी आणि शाळेतच शिकवले जातात. म्हणूनच मुलांना खूप शीक आणि चांगली नोकरी शोध हा सल्ला देणं खूप धोक्याचं आहे. मुलांना उच्च दर्जाच्या आणि आधुनिक शिक्षणाची खूप गरज आहे. सध्याची शिक्षण पद्धती ते देत नाही. शाळेत किती कॉम्प्युटर्स आहेत किंवा शाळा किती खर्च करते, याविषयी मला काहीच घेणंदेणं नाही. मुळात ज्या विषयी शाळेला, शिक्षकांना आणि पालकांनाच माहीत नाही, त्याचं प्रशिक्षण ते देणार तरी कसं?
हे असं असेल, तर जे विषय शाळेत शिकवले जात नाहीत, ते पालकांनी मुलांना कसे शिकवावेत? मुलांना अकाउंटिंग हा विषय कसा शिकवावा? पालक म्हणून ते स्वत:च जोखीम घेण्याच्या विरोधात असतील, तर मुलांना गुंतवणूक करण्याचं शिक्षण कसं देतील? मी माझ्या मुलांना तरी सुरक्षित खेळण्याऐवजी चलाखीनं खेळायला शिकवलं आहे.’ ते सांगत होते.
‘पालकांची जर ही स्थिती आहे, तर आपण इतका वेळ ज्या गोष्टींविषयी चर्चा करत होतो, त्या या पालकांना समजावून कशा सांगता येतील? त्यांना त्या फारच सोप्या करून सांगायला हव्यात. ते कसं करायचं?’ मी विचारलं.
‘मी यावर एक पुस्तक लिहिलं आहे,’ त्यांनी उत्तर दिलं.
‘कुठे आहे?’
‘माझ्या संगणकात. बरीच वर्षं लिहितो आहे मी. तुकड्या तुकड्यानं लिहितो. सारं पुस्तक तसंच तुकड्यांमध्ये आहे. ते तुकडे मी जोडलेले नाहीत. माझं दुसरं पुस्तक ‘बेस्ट सेलर’ ठरल्यानंतर मी हे लिहायला घेतलं होतं; पण ते अजूनही अपूर्ण आहे. अजून तुकड्यांमध्येच आहे.’ त्यांनी सांगितलं.
खरंच ते पुस्तक तुकड्यातुकड्यांमध्येच होतं. ते सारे भाग वाचताना मला जाणवलं, की याचं खूप छान पुस्तक होईल. सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत तर त्याची खूपच आवश्यकता आहे. मग त्या पुस्तकाचं आम्ही दोघांनी मिळून लेखन करावं, असं ठरलं.
‘आताच्या परिस्थितीत एखाद्या मुलाला आर्थिक बाबींची किती माहिती असावी?’ मी विचारलं.
‘ते सर्वस्वी त्या मुलावर अवलंबून आहे,’ त्यांनी उत्तर दिलं.
आपण श्रीमंत व्हायचं आहे, असा निश्चय त्यांनी लहानपणीच केला होता. त्यांना श्रीमंत होण्याचा ध्यासच लागला होता. एका बाबतीत ते सुदैवी होते, त्यांचे वडिलांसमान व्यक्तिमत्व श्रीमंत होते आणि मार्गदर्शन करायलाही तयार होते. रॉबर्ट म्हणाले, ‘शिक्षण हा यशाचा पाया आहे. ज्याप्रमाणे शैक्षणिक कौशल्य महत्त्वाचं आहे, त्याप्रमाणे आर्थिक आणि संवादाचं कौशल्यही महत्त्वाचं आहे.’
पुढे येणारी कथा ही रॉबर्ट यांच्या दोन वडिलांचीच कथा आहे. त्यातले एक श्रीमंत, तर दुसरे गरीब आहेत. त्यांनी आयुष्यभरात जे कमावलं, ते इथं पाहायला मिळतं. या दोन्ही डॅडमध्ये असलेली तफावत आपल्यापुढेही महत्त्वाचं चित्र उभं करते. हे पुस्तक मी संपादित केलं आहे, नीट जुळवलं आहे. अकाउंटंट लोकांनी हे पुस्तक वाचताना आपलं पुस्तकी ज्ञान थोडावेळ बाजूला ठेवून रॉबर्ट यांनी मांडलेल्या तात्त्विक भूमिकेकडे मोकळ्या मनानं पाहावं. काही बाबतीत ते अकाउंटिंगच्या मूल तत्त्वांना आव्हान देत असले, तरी गुंतवणुकदार आपल्या गुंतवणुकींचे निर्णय कसे घेतो, याचं यामध्ये स्वच्छ प्रतिबिंब दिसतं.
आपण जेव्हा मुलांना ‘शाळेत जा, अभ्यास करा आणि चांगली नोकरी मिळवा,’ असा सल्ला देतो, तेव्हा तो आपल्या जुन्या दृष्टिकोनातून दिलेला असतो. त्या दृष्टीनं तो योग्यही असतो. मी जेव्हा रॉबर्ट यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्यांच्या काही कल्पना ऐकून मलाही धक्काच बसला होता. मुळात त्यांचं संगोपन दोन डॅडनं केलं. त्यामुळे त्यांच्यापुढे दोन ध्येय होती आणि ती गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे संस्कारही झाले होते. उच्चशिक्षित डॅडनं त्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळवण्याचा, तर श्रीमंत डॅडनं एखाद्या कंपनीचा मालकच होण्याचा सल्ला दिला. या दोन्ही मार्गांवरून जाण्यासाठी शिक्षण आवश्यकच होतं. फक्त अभ्यासाचे विषय वेगळे होते. उच्चशिक्षित डॅडनं त्यांना हुशार आणि चुणचुणीत होण्यासाठी प्रोत्साहन दिलं, तर श्रीमंत डॅडनं अशा माणसांना हेरून कामावर कसं ठेवायचं, हे शिकवलं.
दोन वडील असल्यामुळे त्यांना काही प्रश्नांनाही तोंड द्यावं लागलं. त्यांचे जन्मदाते वडील हवाई राज्याच्या शिक्षण खात्याचे अधिकारी होते. रॉबर्ट सोळा वर्षांचे असताना त्यांनाही ‘उत्तम गुण मिळाले नाहीत, तर उत्तम नोकरी मिळणार नाही,’ ही धमकी देण्यात आली होती. अर्थात त्यांच्यावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही; कारण त्यांनी आपला मार्ग आधीच ठरवला होता. त्यांना नोकरी करायचीच नव्हती. मालक व्हायचं होतं. शाळेच्या सल्लागारांनी जर चिकाटीनं प्रयत्न केले नसते, तर रॉबर्ट महाविद्यालयाची पायरीही चढले नसते. त्यांना आपली मालमत्ता वाढविण्याची घाई झाली होती. अर्थात, या महाविद्यालयीन शिक्षणाचा फायदाच झाला, असं तेही कबूल करतात.
या पुस्तकातील काही कल्पना काही पालकांना अगदी मूलगामी, तर काहींना ओढूनताणून आणल्यासारख्या वाटतील. काही पालकांना आपल्या मुलांना शालेय शिक्षण देणंही अवघड होत चाललं आहे. तरीदेखील या बदलत्या काळात पालक म्हणून आपणही धाडसी कल्पनांना सामोरं जायला हवं. मुलांना नोकरी करण्यासाठी उत्तेजन देणं म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त कर भरण्याचा सल्ला देणंच आहे. शिवाय निवृत्ती वेतनाची खात्री नाहीच. आपल्या खर्चातील सर्वांत मोठा खर्च करांचाच असतो, हेही सगळ्यांना मान्य व्हावं. बहुतेकजण जानेवारी ते मे हे महिने कर भरण्यासाठीच काम करतात. म्हणूनच आपल्याला नव्या कल्पना हव्या आहेत आणि हे पुस्तक ती गरज भागवतं.
रॉबर्ट असं म्हणतात, की श्रीमंत लोक आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीनं शिकवतात. ते त्यांना घरीच बोलताना, जेवताना शिकवत असतात. कदाचित तुम्हाला ही गोष्ट पटणारही नाही. तरीदेखील तुम्ही हे पुस्तक वाचत आहात, म्हणून मी तुमची आभारी आहे. मी तुम्हाला आणखी काही सांगू इच्छिते. उत्तम गुण आणि चांगली नोकरी, हा सल्ला आता जुना झाला आहे. एक आई आणि सीपीए म्हणूनही मला हेच वाटतं. आपल्या मुलांना आपणच आधुनिक सल्ला द्यायला हवा. नव्या कल्पना आणि नवीन शिक्षण पद्धती ही आपली आजची गरज आहे. उत्तम नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करा हे सांगतानाच एखाद्या गुंतवणूक संस्थेचे मालक व्हा, हे सांगणंही काही वाईट नाही.
हे पुस्तक पालकांसाठी उपयुक्त ठरेल, असा एक आई म्हणून मला विश्वास वाटतो. परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला, तर त्यात काहीच अशक्य नसतं, हे साऱ्यांना समजावं असं रॉबर्टना वाटतं. तुम्ही आज एखाद्या इमारतीची देखभाल करण्याचं काम करत असाल, माळीकाम करत असाल किंवा अगदी बेकार असाल, तरीही अर्थविषयक शिक्षण घेण्याची क्षमता सगळ्यांमध्येच असते. ज्यांना यामध्ये रस वाटतो, त्यांनाही हे शिकवता येतं. आर्थिक हुशारी ही आपलीच मानसिक कार्यपद्धती आहे. तिचा वापर करून आयुष्य बदलून टाकता येतं. प्रश्न सोडवता येतात.
आपण आज जागतिक आणि औद्योगिक बदलांना सामोरे जात आहोत. असे बदल आपण पूर्वी कधीच पाहिलेले नव्हते. नेमकं भविष्य स्पष्टपणे पाहाण्याची शक्ती कोणाकडेच नाही; पण एक गोष्ट निश्चित आहे, की घडणारे आणि घडू पाहाणारे बदल आपल्या अनुभवांच्या पलीकडचे आहेत. काहीही घडलं, तरी आपल्यासमोर दोन पर्याय असतील, सुरक्षित खेळा किंवा स्वत:ची आणि मुलांची आर्थिक बुद्धिमत्ता जागृत करून हुशारीनं खेळा!
💰 *क्रमशः*

Comments
Post a Comment